ज्ञानस्रोत च का?

ज्ञानस्रोत ॲप संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचे स्थान, भाषा आणि आर्थिक स्थिती विचारात न घेता फक्त त्यांना अभ्यासाची काळजी घेण्यासाठी बनवण्यात आलेले आहे. हे ॲप फक्त इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थी यांच्या पुरताच मर्यादित नाही.

ज्ञानस्रोत ॲप संपूर्ण आधुनिक अभ्यासक्रम तुमच्या भाषेत तेही शालेय पद्धतीने शिकवत. यामुळेच ज्ञानस्रोत केवळ एका शिक्षण मंडळासाठी नसून सर्वांसाठी आहे. आम्ही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांसाठी पहिला टप्पा पार केलेला आहे. ज्यात ९ भाषांमध्ये १४ बोर्डस समाविष्ट आहेत.

प्रत्येक संकल्पनेचे ॲनिमेटेड आणि ग्राफिकल प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांना विषय समजण्यास मदत करतात. वास्तविक उदाहरणे आणि ॲनिमेशन ने भरपूर असे व्हिडिओ विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान दैनंदिन जीवनात सुद्धा वापरण्यास मौल्यवान ठरतात. ज्ञानस्रोत एक असे शक्तिशाली साधन आहे, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात परिपूर्ण बनवते. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे एक व्यासपीठ आहे.

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात विशेष बंधन असून पण खूप वेळा विद्यार्थ्यांना एकाच वेळेस समजत नाही. विद्यार्थी वर्गामध्ये शंका उपस्थित करताना लाजतात. त्याची कारणेही बरीच असू शकतात. पण त्याची चर्चा करण्याची हि जागा नाही. या समस्येवर मात करण्यासाठी ज्ञानस्रोत मधील अनुभवी शिक्षक संपूर्ण अभ्यासक्रम प्रदान करतात. ज्ञानस्रोत मध्ये विद्यार्थी शिक्षकांकडून हवे तितक्या वेळा समजून घेऊ शकतात. रिप्ले आणि रिप्ले. शिक्षक काहीही बोलणार नाहीत. परीक्षेच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना ६ ते ८ महिन्या पूर्वीचे लेक्चर्स आठवत नाहीत. आणि बऱ्याचदा वर्गामध्ये आधीचे लेक्चर्स ची पुनरावृत्ती होणे ही शक्य नसते. अश्या वेळेस ज्ञानस्रोत चे शिक्षक कोणतीही अतिरिक्त शुल्क न घेता उपलब्ध असतात. इंटरनेट असो व नसो, आँफलाईन मोडवर video सुरु करा आणि आपल्या आठवणी ताज्या करा.

आम्ही विविध शैक्षणिक मंडळे अंतिर्भूत करतो, आम्ही अनेक भाषांमध्ये शिकवतो, आम्ही सगळे विषय सोपे बनवतो. आम्ही वैविध्यपूर्ण आहोत, आम्ही ज्ञानस्रोत आहोत!