ज्ञान विरुद्ध शाळा

आता याचे उत्तर द्या -

तुम्ही पुढीलपैकी कशाला जास्त महत्व देता, खरे शिक्षण कि परीक्षेत चांगली श्रेणी?

हाच प्रश्न भारतीय शिक्षण व्यवस्थेतील गुंतागुंत जाणून घ्यायला मदत करतो. हि वस्तुस्थिती खूप दुःखदायक आहे कि विद्यार्थी अश्या शिक्षण व्यवस्थेत वाढतात जिथे त्यांना त्यांचे ज्ञान सिद्ध करण्यासाठी परीक्षेला बसणे आवश्यक आहे, म्हणून यासाठी विद्यार्थी फक्त त्याची तयारीच करत नाहीत, तर त्यात प्राविण्य हि मिळवतात.

असे बोलले जाते कि, ज्ञानस्रोत येथील संशोधन आणि विकास विभाग, ज्ञानाभिमुख आणि परीक्षाभिमुख अभ्यास पद्धतीचे योग्य विलीनीकरण निश्चित करते आणि हाच सर्वात व्यावहारिक दृष्टिकोन आहे, कारण ज्ञान आणि परीक्षा यांना एकमेकांवर ठेवणे दोघांसाठी चुकीचे आहे, ज्ञानस्रोत हे अभिमानाने सांगते कि आम्ही हे संतुलन साधले आहे जिथे विद्यार्थी वर्ग त्यांचा नियमित अभ्यास करताना जास्तीत जास्त परिपूर्ण ज्ञान प्राप्त करतात.

पण कसे?

ज्ञानस्रोत विद्यार्थ्यांच्या मौल्यवान वेळेचा वापर करणाऱ्या पारंपरिक शिक्षण पद्धतीचा वापर न करता, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम प्रणाली चे अनुसरण करतो. ज्ञानस्रोत त्याच वेळी हि पण खात्री करतो कि, कोणत्याही गोंधळा शिवाय, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयाचा योग्य तपशील दिला जाईल. याप्रकारे परिपूर्ण विकासाचा एक साचा तयार होतो.

ज्ञानस्रोत वेगवेगळ्या शैक्षणिक मंडळांनी ठरवलेल्या मार्गाचे पालन करतो.. उदा. पहिल्या सत्राच्या परीक्षेआधी अभ्यासक्रमातील विशिष्ट भाग पूर्ण करावा लागतो. शालेय सत्रांचे हे विभाजन विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय शिक्षण पद्धतीशी जुळवून घेण्यास मदत करेल याची ज्ञानस्रोत काळजी घेतो.

आम्ही सध्याच्या शिक्षण व्यवस्थेला अजून परिपूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी बांधील आहोत.