अनेक बोर्ड

आपल्या देशाची ताकद त्याच्या विविधतेमध्येच आहे.. विविध प्रकारची भाषिक-सामाजिक पार्श्वभूमी आणि एका विशिष्ट चौकटीमधल्या मुलांचे पालन पोषण यांच्या एकत्रित साच्या मधूनच त्यांची ओळख बनते. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासासाठी त्यांना त्यांच्या साच्या मधूनच योग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. आणि हीच जाणीव ठेऊन प्रत्येक राज्य सरकार आपल्या राज्या नुसार नवीन शिक्षण धोरणे तयार करण्यास स्वतंत्र आहे. म्हणूनच अभ्यासक्रम आणि नियमावली राज्या राज्या नुसार वेगळी आहे.. विविध शिक्षण मंडळे आहेत. वेगवेगळ्या शैक्षणिक मंडळांचे वेगवेगळे विषय असतात, तसेच अध्यापनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो.
उदा. पश्चिम बंगाल मध्ये विज्ञान हा विषय सामान्य विज्ञान आणि जैविक विज्ञान यांमध्ये विभागला आहे. म्हणून तेथील विद्यार्थी बोर्ड परीक्षांमध्ये दोन्ही विज्ञान विषयाची परीक्षा देतात पण उर्वरित भारतात विद्यार्थी विज्ञान ची १०० मार्कांची एकच परीक्षा देतात. त्याच प्रमाणे ओरिसा मध्ये विद्यार्थ्यांना तीन भाषांचा अभ्यास करणे बंधनकारक आहे; ज्यात इंग्रजी अनिवार्य आहे, आणि ओरिया, हिंदी व संस्कृत या पैकी कोणत्याही २ भाषा निवडू शकतात. तर असा प्रश्न पडतो कि या सर्व घटकांची काळजी घेणारे कोणते व्यासपीठ आहे का?
हो! ज्ञानस्रोत!.. आमचे ब्रीदवाक्यच आहे कि "यश सर्वांच्या हातात". छान आहे ना?
आम्ही ९ भाषांमध्ये १४ बोर्डस घेऊन येत आहोत. ज्ञानस्रोत प्रत्येक तपशिलांची काळजी घेतो आणि प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांना तसेच तिथल्या शिक्षण व्यवस्थेला देखील महत्व देतो.
परिणामी,एकदा का विद्यार्थ्याने त्याचे शैक्षणिक मंडळ निवडले कि, ज्ञानस्रोत त्याच्या साठी योग्य अभ्यासक्रम तयार करतो, जो शालेय अभ्यासक्रमाशी संलग्न राहतो.