अनेक भाषा

निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल |
बिनु निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल ||

प्रख्यात कवी भारतेंदु हरिश्चंद्र यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे कि एका व्यक्तीच्या परिपूर्ण विकासासाठी त्याची मातृभाषा कश्या प्रकारे आवश्यक आहे, आणि म्हणूनच भारतात २२ आधुनिक भाषा भारतीय संविधानाद्वारे मान्यता प्राप्त आहेत.

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा इंग्रजी साक्षर देश असेलही पण जागतिक भाषेचे ज्ञान इतर भारतीय भाषेबद्दल भाषा द्वेषी मानसिकता निर्माण करण्याची परवानगी देऊ शकत नाही. भारतातील बहुतांश विद्यार्थी आजही आपापल्या स्थानिक भाषेमध्ये शिकत असल्याने ज्ञानस्रोत इंग्रजीला केवळ शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरत नाही. यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना शिक्षण तंत्रज्ञानाचा फायदा घेता येतो.

आम्ही सांगू इच्छितो कि ज्ञानस्रोतच्या संशोधन आणि विकास विभागाला असे आढळले आहे कि, बहुतेक वेळा जेव्हा विद्यार्थी उच्च माध्यमिक मध्ये जातात, तेव्हा त्यांच्या अभ्यासक्रमाची भाषा स्थानिक भाषेतून इंग्रजीमध्ये बदलते आणि याचमुळे शैक्षणिक निकालाच्या टक्केवारीत मोठी घट निर्माण होते. अगदी हुशार मुलांच्या निकाला मध्ये पण हा फरक असतो.

हा बदल टाळण्यासाठी ज्ञानस्रोत सर्व शैक्षणिक विषय स्थानिक तसेच इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देतो. जेणेकरून विद्यार्थी शब्दांची तुलना करू शकतात आणि योग्य शब्दावली समजून घेऊ शकतात. अशा प्रकारे ते वर्गामध्ये आत्मविश्वासाने वावरतात.

शेवटी हेच सांगायचे आहे, अनेक जगप्रसिद्ध भारतीय विद्वानांनी त्यांचे शालेय शिक्षण एका मुख्य भारतीय भाषेमध्येच सुरु केले होते. म्हणतात ना, "जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करायचा असेल तर त्याच्याशी त्याच्या मातृभाषेत बोला."